रत्नागिरी, प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील वेल्ये गावातून शेळी पालन योजनेचे मुल्यमापन पाहणी करुन परतताना अस्वस्थ झालेल्या कर्मचार्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3.51 वा.घडली.विजयकुमार धोंडीराम काटवटे ( वय-48,रा.शंकेश्वर गार्डन गीताभवन जवळ,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कर्मचार्याचे नाव आहे.
गुरुवार 3 ऑगस्ट रोजी ते जिल्हा सांख्यिकी कार्यालय रत्नागिरीतून मुल्यमापन व पहाणी अभ्यासांतर्गत ठाणबंद शेळी पालन योजनेचे मुल्यमापन पाहणी करण्यासाठी गेले होते.पाहणी करुन परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले.ही बाब त्यांनी त्याच्या सहकार्याला सांगितली.थोडावेळ खाली बसून थोडे बरे वाटल्यावर ते परत येत असताना त्यांचा अचानकपणे तोल जाऊन खाली पडून बेशुध्द झाले.त्यांच्या सहकार्यांनी त्यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









