चेन्नई :
चेन्नईतील कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने सुदर्शन वेणू यांची चेअरमन म्हणून निवड केली आहे. ते आपल्या पदाचा कार्यभार 25 ऑगस्ट 2025 पासून घेतील अशी माहिती संचालक मंडळाकडून देण्यात आली आहे.
संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये सुदर्शन वेणू यांच्या नावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली आहे. टीव्हीएस मोटरच्या विकासामध्ये सुदर्शन वेणू यांचे योगदान बहुमूल्य ठरलेले आहे. शाश्वत विकासासोबतच कंपनीच्या धोरणात्मक विकासात त्यांचा वाटा लक्षणीय राहिला आहे. संचालक म्हणून काम करताना त्यांनी कंपनीच्या एकंदर कार्याला गती देण्याचे काम केले होते. 25 ऑगस्ट 2025 पासून सुदर्शन वेणू चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पद सांभाळणार आहेत. सध्याचे चेअरमन सर राल्फ स्पेथ हे या पदावरून पायउतार होणार आहेत.
ते पुढील तीन वर्षे कंपनीमध्ये वेगळ्या कार्यासाठी कार्यरत असणार आहेत.









