सातारा प्रतिनिधी
सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जगात साताऱ्याचे नाव करणारे डॉ. संदीप काटे यांच्या सौभाग्यवती डॉ. सुचित्रा काटे यांनी युरोपातील एस्टोनिया देशातील टॅलिन येथे पार पडलेल्या आर्यनमॅन या स्पर्धेत विक्रमी वेळेत पूर्ण करुन सातारा जिह्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वप्रथम त्यांच्या दोन्ही मुलांसह त्यांचे पती डॉ.संदीप काटे यांनी अभिमानाने तिरंगा फडकवला. दरम्यान, या स्पर्धेत पुरुष गटात हेमल उपाध्ये हे आयर्नमॅन ठरले आहेत.
सातारा शहराला हिल मरेथॉनच्या रूपाने नवीन ओळख डॉ. संदीप काटे यांनी दिली. धावणे हेच फिजिकल फिटनेसचा राज आहे हे गमक त्यांनी सातारकराना दिले आहे. सातारा हाफ हिल मॅरेथॉनच्या रूपाने सातारचे नाव जगात त्यांनी केले. नुसते स्वतः धावून थांबले नाहीतर तर त्यांनी त्यांच्या सौभाग्यवती डॉ. सुचित्रा काटे यांना ही धावायला लावले. त्यांनी ही आपले पतीराज डॉ. काटे यांच्या सल्ल्यानुसार धावणे सुरू केले. मग त्या काही थांबल्या नाहीत.
सुचित्रा काटे यांनी आपला ठसा यापूर्वी मरेथॉन स्पर्धेतही उमटवला होता. मात्र, त्यांनी दि. 6 ऑगस्ट रोजी एस्टोनियमाची राजधानी टॅलिन येथे आर्यरनमॅन ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत साताऱ्यातून महिलांमधून डॉ. सुचित्रा काटे आणि पुरुषांमधून हेमल उपाध्ये यांनी सहभाग घेतला होता. 17 तासाची असलेली ही स्पर्धा अत्यंत शारिरिक कसोटीची असते. यात पहिल्यांदा 4 किलोमीटर पोहणे, नंतर 180 किलोमीटर सायकलींग, त्यानंतर 42 किलोमीटर धावणे हे तीन टास्क पूर्ण करावे लागतात. यासाठी 17 तासांचा कालावधी असतो पण त्यापूर्वीच त्यांनी 16 तास 48 मिनिटात पूर्ण केले. त्यांनी हा टास्क पूर्ण करून सातारा जिल्ह्यातील पहिल्या महिला ठरल्या असून त्यांचे अभिनंदन तेथेच त्यांचे पती डॉ.संदीप काटे व दोन्ही मुलांनी केले. डॉ. सुचित्रा काटे या स्पर्धेच्या अनुषंगाने सराव करत होते. यापूर्वी झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला होता.
माझ्यासाठी हे यश आनंददायी
माझ्यासाठी हे यश आनंद दायी आहे. माझे यश महिलांना प्रेरणादायी ठरत असेल तर माझ्यासाठी महत्वाचे आहे. माझ्या यशात माझ्या कुटुंबातील सदस्यांचा, माझ्या पतीचा, माझ्या मुलांचा, सातारकरांचा मोलाचा वाटा आहे.- डॉ.सुचित्रा काटे