समस्येचे कायमस्वरुपी निवारण करण्याची मागणी
बेळगाव : कोतवाल गल्ली येथील ड्रेनेज चेंबरची समस्या जैसे थे आहे. दर आठवड्याला चेंबर स्वच्छ केले गेले त् ारी पुन्हा चेंबर भरत असून सर्वत्र अनारोग्य पसरले आहे. दुर्दैव म्हणजे ड्रेनेज चेंबरच्या जवळच भाजीविक्रेते भाजी विकत आहेत. ही बाबसुद्धा धोकादायक आहे. भाजी विक्रेत्यांना दुसरी जागा नाही. त्यामुळे ते अशा अस्वच्छ वातावरणात भाजी विकत आहेत. मात्र, चेंबरच्या पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने त्यांना तेथे बसणेही कठीण झाले आहे. या भागाच्या नगरसेवक आफ्रोज शकील मुल्ला यांनी सातत्याने ही बाब महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करत असूनही ही समस्या सुटलेली नाही. दुर्गंधीमुळे दूषित होणारे वातावरण आणि त्यामुळे आरोग्याला उद्भवणारा धोका लक्षात घेऊन या समस्येचे कायमस्वरुपी निवारण करावे, अशी मागणी होत आहे.









