कुत्रा, गाय आदी जनावरांची जीभ खूपच लांब असते हे आपल्याला माहीत आहे. तथापि, माणसाची जीभ जास्तीत जास्त 3.34 इंच लांब असते. महिलांची जीभ यापेक्षा काहीशी कमी, म्हणजे 3.11 इंच लांब असते. पण जगात सर्वात लांब जीभ अमेरिकेचा नागरीक निक स्टोर्बल याची असून ती तब्बल 3.97 इंच आहे. या व्यक्तीने जीभेच्या साहाय्याने अनेक विश्वविक्रम केले आहेत.
एकदा त्यांनी एका भारतीय व्यक्तीला जीभेने रंगकाम (पेंटिंग) करताना पाहिले. त्यानंतर त्यांनीही अशा प्रकारे पेंटिंग करुन पाहिले. नुकताच त्यांनी आपल्या लांब जीभेने आणखी एक विक्रम केला आहे. हा विक्रम गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यांनी एका मिनिटात आपले नाक तब्बल 281 वेळा नाकाला लावले आहे. हे करताना त्यांनी पूर्वीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. आता त्यांनी आणखी एक अचाट विक्रम केला असून त्यासाठी त्यांची जगभरात प्रशंसा होत आहे. त्यांनी केवळ आपल्या जीभेने ‘झेंगा ब्लॉक‘च्या एका संपूर्ण संचामधून 5 झेंगा ब्लॉक्सना (ठोकळे) अलग करुन दाखविले आहे. त्यामुळे त्यांची जीभ केवळ लांबच आहे असे नव्हे, तर ती तितक्याच प्रमाणात बलवानही असल्याचे सिद्ध केले आहे.
‘लांब जीभेचा’ हा वाक्प्रचार आपल्याकडे अति बोलण्याची सवय असलेल्यासाठी उपयोगात आणला जातो. तथापि, निक स्व्टोबर्ल यांची जीभ जगातील सर्व मानवांमध्ये सर्वात लांब असूनही ते अतिशय मितभाषी आहेत, असे त्यांची निकटवर्तीय म्हणतात. त्यांना आपल्या लांब जीभेचा बोलताना किंवा अन्नग्रहण करताना कोणताही त्रासही होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.









