समस्त भारतीयांच्या आदराचे स्थान असणाऱया भारतीय सेनेचे चार सैनिक एका मेट्रो स्थानकावर उभे आहेत… अचानक एक बालिका समोर येते आणि त्या सैनिकांच्या पाया पडते… ते सैनिक क्षणभर आश्चर्यचकित होतात, भांबावतात पण नंतर त्यांना एका अनोळखी बालिकेने दिलेल्या या सन्मानामुळे भाऊकही होतात… मेट्रो स्थानकावरील हे दृष्य सध्या युटय़ूबवरून प्रसारित होत असून लक्षावधी लोकांनी त्याला लाईक केले आहे. हे भावविभोर दृष्य भाजपचे खासदार पी. सी. मोहन यांनी ट्वीटरवर पोस्ट केले आहे.
या छायाचित्राखाली जी कॅप्शन आहे ती वाचून आपल्याला उचंबळून आल्याशिवाय राहात नाही. त्या बालिकेला उद्देशून ही कॅप्शन म्हणते, बालकांना आणि युवकांना असे संस्कार देणे हे या महान राष्ट्रातील माता-पित्यांचे कर्तव्य आहे. ही बालिका जेव्हा एका सैनिकाच्या पाया पडते तेव्हा तोही भाऊक होऊन तिच्या मस्तकावर हात ठेऊन तिला आशीर्वाद देतो.
हे दृष्य कोणत्या मेट्रो स्थानकावरचे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि ते खरे आहे एवढे निश्चित झालेले आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांनीही ते हे दृष्य शेअर केलेले आहे. अनेक असंख्य ट्वीटर युजर्सनी त्यावर बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या बालिकेचे आणि तिच्यावर असे संस्कार करणाऱया तिच्या अज्ञात माता-पित्यांचे कौतुक अनेक युजर्सनी केले आहे.








