Successive death of many brothers, mountain of grief on the families
अवघ्या पाच दिवसात दोन सख्ख्या भावांचे पाठोपाठ निधन झाल्याची दुर्दैवी घटना माजगाव नाला नजीक कुंभारवाडा येथे घडली. पाठोपाठच्या या दोन दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. हे दोघे भाऊ पेंटिंगची कामे करत होते. नेहमी हसतमुख व मनमिळावू स्वभावाच्या या दोन सख्ख्या भावांच्या पाठोपाठच्या निधनाचा सर्वांच्याच मनाला चटका लागला.
अनिल लक्ष्मण पाटकर (६८) यांचे २१ सप्टेंबर रोजी आकस्मित निधन झाले होते. या दुःखातून पाटकर कुटुंबिय सावरत असतानाच अनिल पाटकर यांचे सख्खे भाऊ शिवदास लक्ष्मण पाटकर (५९) यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. पाठोपाठच्या या दुर्दैवी घटनेमुळे माजगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दोन सख्ख्या भावांच्या निधनामुळे माजगावात शोककळा पसरली असून पाटकर कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. सोमवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिल पाटकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, भावजय पुतणी, नातवंडे असा परिवार आहे. तर शिवदास पाटकर यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, भावजय पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. सावंतवाडी गरड येथील त्रिवेणी प्रसाद पेट्रोलियम पंपाचे कर्मचारी नितीन पाटकर, पेंटर सचिन पाटकर, सावंतवाडी येथील एक्वागार्ड गार्ड सर्व्हिस सेंटर चालक रूपेश पाटेकर यांचे ते वडील होत तर माजी उपसरपंच राजन पाटकर यांचे ते चुलत भाऊ होते.
ओटवणे /प्रतिनिधी-









