जयपूर
राजस्थानच्या जयपूरमध्ये 9 वर्षीय अक्षित 200 फूट खोल कूपनलिकेमध्ये शनिवारी सकाळी कोसळला होता. कूपनलिकेमध्ये सुमारे 70 फुटांच्या खोलीवर तो अडकून पडला होता. 6 तासांच्या बचावकार्यानंतर त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. अक्षित सुमारे 7 तासांपर्यंत कूपनलिकेमध्ये अडकून पडला होता. एनडीआरएफ पथकाने लोखंडी जाळीच्या मदतीने त्याला बाहेर काढले आहे. अक्षितला रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.









