मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते कापणीचा शुभांरभ
फोंडा : साधारण पंधरा वर्षे पडिक राहिलेल्या तळावली गावातील शेतजमिनीत काळ्या तांदळाची लागवड करण्यात आली असून पिकाच्या कापणीचा विधीवत शुभारंभ स्थानिक आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते करण्यात आला. कुटुंबण शेतकरी संघटनेतर्फे यंदा पहिल्यांदाच प्रायोगित तत्त्वावर काळ्या तांदळाची लागवड करण्यात आली आहे. तळावली गावातील मुख्य पारंपरिक शेतजमिन गेल्या काही वर्षांपासून लागवडीविना पडिक राहिली होती. डॉ. पांडुरंग सावंत तळावलीकर, भगवंत नाईक, शंकर सतरकर व अन्य काही ग्रामस्थांनी सन 2019 मध्ये ही शेतजमिनी पुन्हा लागवडीखाली आणण्याचे प्रयत्न सुऊ केले. त्यासाठी पन्नासहून अधिक शेतकऱ्यांना एकत्र कऊन कुटुंबण शेतकरी संघटना स्थापन करण्यात आली. सुऊवातीला काही लाख चौरस मीटर शेतीपैकी केवळ 3 हजार चौरस मिटरच्या जमिनीत भातशेती लावण्यात आली. एमपीटीचे माजी उपसंचालक व पर्यारवणप्रेमी अभय केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग सुऊ झाला. पूर्वापार भातशेतीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे वय झाल्याने व तरुण पिढीला शेतीमध्ये उत्साह नसल्याने साधारण 15 वर्षे गावातील ही शेती पडीक होऊन राहिली होती. नव्याने सुऊवात करताना केसरकर यांनी शेतकऱ्यांना नागरणीसाठी व बी पेरणीसाठी यांत्रिक पद्धतीचे महत्त्व पटवून देत ही यंत्रे व त्यासाठी कुशल कामगार उपलब्ध कऊन दिले. शिवाय लागवडीसाठी 50 टक्के सरकारी अनुदानही मिळवून दिले. आवश्यक आर्थिक मदतही केली. स्थानिक आमदार तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही शेतकऱ्यांचा उत्साह पाहून आवश्यक ते सहकार्य केले. मात्र कोरोनाच्या काळात त्यात थोड्या अडचणी आल्या.
कोरोना काळानंतर परिस्थिती सावऊ लागल्याने नवीन प्रयोग म्हणून यंदाच्या हंगामात काळ्या तांदळाची लागवड करण्यात आली. काळा तांदूळ पोषक व आरोग्यवर्धक असल्याने त्याला बाजारात जास्त मागणी आहे. प्रति किलोमागे रु. 300 ते रु. 400 दराने हा तांदूळ विकला जातो. पहिल्या प्रयत्नात प्रयोग यशस्वी झाल्याने शेतकरी संघटनेचा उत्साह वाढला आहे. येत्या पावसाळी हंगामात संपूर्ण शेती लागवडीखाली आणण्याचा कुटुंबण शेतकरी संघटनेचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे रासायनीक खतांचा वापर न करता सेंद्रीय पद्धतीने लागवड करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. कापणीच्या कार्यक्रमप्रसंगी मंत्री सुदिन ढवळीकर यांनी शेतकरी संघटनेला आवश्यक ते साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कार्यक्रमाला सरपंच वसुंधरा सावंत तळावलीकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, डॉ. नूतन देव, गोपीनाथ नाईक व अन्य पंचसदस्य उपस्थित होते.









