पोखरणमध्ये सैन्याकडून परीक्षण
वृत्तसंस्था/पोखरण
पाकिस्तानसोबत झालेल्या संघर्षानंतर भारतीय सैन्य आता स्वत:च्या ताफ्यात अधिकाधिक युएव्ही (अनमॅन्ड एरियल व्हीकल्स) सामील करू इच्छिते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पहिल्यांदाच ड्रोन्स, क्षेपणास्त्रs आणि म्युनिशन्ससोबत नॉन-कॉन्टॅक्ट मिलिट्री ऑपरेशन्स हाताळले आहे. आता भारतीय सैन्याने सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेडच्या (एसडीएएल)च्या हायब्रिड वर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग (व्हीटीओएल) युएव्ही रुद्रास्त्रचे यशस्वी परीक्षण केले आहे. पोखरण फायरिंग रेंजमध्ये रुद्रास्त्रचे परीक्षण झाले. भारतीय सैन्याच्या आवश्यकतेनुसार रुद्रास्त्रने कामगिरी केली आहे. यात व्हीटीओएल, लाँग एंड्योरेन्स, प्रिसिजन एंगेजमेंट आणि ऑपरेशन वर्सेटिलिटी यासारखी वैशिष्ट्यो सामील होती. परीक्षणादरम्यान रुद्रास्त्रने 50 किलोमीटरपेक्षा अधिकच्या मिशन रेडियसवर स्टेबल रियल-टाइम व्हिडिओ लिंक कायम ठेवला. युएव्हीने मिशन पूर्ण केले. कुठल्याही समस्येशिवाय युएव्ही लाँच पॉइंटवर परतला. एकूण पल्ला, ज्यात टार्गेट-एरियामध्ये लॉयटरिंग देखील सामील आहे, तो 170 किलोमीटरपेक्षा अधिक होती. याची एंड्योरेन्स सुमारे 1.5 तास राहिला आहे.
अनेक मोहिमांमध्ये वापर शक्य
व्हीटीओएल युएव्ही टेहळणी, टार्गेट एंगेजमेंट आणि हेरगिरीसाठी वापरले जाऊ शकतात. भारतीय सशस्त्र दलांनी विविध निर्मात्यांकडून व्हीटीओएल युएव्ही प्राप्त केले आहेत. तर रुद्रास्त्र अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्वदेशी व्हीटीओएल युएव्ही आहे. यशस्वी परीक्षण आणि आवश्यक प्रक्रियांनंतर हा युएव्ही भारतीय सैन्यात सामील होऊ शकतो. रुद्रास्त्रचे यशस परीक्षण भारतीय सैन्याचे आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. हा युएव्ही तांत्रिक स्वरुपात अत्याधुनिक असण्यासोबत याची कामगिरी देखील अत्यंत चांगली राहिली आहे. आगामी काळात रुद्रास्त्र भारतीय सैन्याच्या क्षमतेत भर घालणार आहे.









