वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय दर्जाची भारताची महिला मल्ल तसेच विश्व चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेती विनेश फोगटच्या दुखापत झालेल्या गुड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केली. सदर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल विनेशने डॉक्टरांचे आभार मानले आहे.
या दुखापतीमुळे विनेश फोगटला 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या हेंगझोयु आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे. या शस्त्रक्रियेनंतर विनेशला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात 17 ऑगस्ट रोजी तज्ञ डॉक्टरांनी विनेशच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर विनेश 2024 च्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपल्या सरावाला प्रारंभ करेल.









