जम्मू-काश्मीरसह ठिकठिकाणी तिरंगा यात्रा : दिल्लीत लाल किल्ल्यावर ‘फुल डेस रिहर्सल’
► वृत्तसंस्था/ श्रीनगर, दिल्ली
देशभरात मंगळवारी साजरा होणाऱ्या स्वातंत्र्य दिनापूर्वी रविवारी ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात आली. तसेच ‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत घरोघरी राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील 20 जिल्ह्यांमध्येही रविवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा श्रीनगरमधील तिरंगा यात्रा कार्यक्रमात सहभागी झाले होते. याशिवाय तिन्ही सैन्यदलाच्या जवानांनी राजधानी दिल्लीत फुल डेस रिहर्सल केली. हवाई दलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरमधून तिरंग्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याची रंगीत तालीम करत सराव करण्यात आला.
स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी देश सज्ज झाला आहे. ऐतिहासिक लाल किल्यावऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोहळ्याचा प्रारंभ करणार आहेत. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्याच्या तटावऊन राष्ट्राला संबोधित करतील. या वषीच्या स्वातंत्र्य दिनी‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. दरम्यान, या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी देशातील विविध स्तरातील सुमारे 1 हजार 800 लोकांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण करण्यात आले आहे. गेल्या वषीच्या तुलनेत यंदा मोठ्या संख्येने पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यापैकी काही विशेष अतिथी दिल्लीमधील आपल्या मुक्कामात राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील. तसेच संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांची भेट घेतील. प्रत्येक राज्यातील 75 जोडप्यांना त्यांच्या पारंपारिक वेशात लाल किल्यावरच्या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
लाल किल्ल्यावर 1,800 विशेष अतिथी
दिल्लीतील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी 1800 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुख्य कार्यक्रमात सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी, मच्छीमार, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात गुंतलेले कामगार, खादी क्षेत्रातील कामगार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे कर्मचारीही येणार आहेत. याशिवाय अमृत सरोवर प्रकल्प आणि हर घर जल योजनेचे कर्मचारी, महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे दोन लाभार्थी यांनाही लाल किल्ल्यावर पाचारण करण्यात आले आहे.
पंतप्रधानांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. त्यांनी लोकांना तिरंग्यासह सेल्फी फोटो हर घर तिरंगा वेबसाईटवर अपलोड करण्यास सांगितले आहे.
12 ठिकाणी ‘सेल्फी पॉईंट्स’
केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रम अधोरेखित करणारे ‘सेल्फी पॉईंट्स’ 12 महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. या ‘सेल्फी पॉइंटस’मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट, विजय चौक, नवी दिल्ली रेल्वेस्थानक, प्रगती मैदान, राजघाट, जामा मशीद मेट्रो स्थानक, राजीव चौक मेट्रो स्थानक, दिल्ली गेट मेट्रो स्थानक, आयटीओ मेट्रो गेट, नौबत खाना आणि शीश गंज गुऊद्वारा यांचा समावेश आहे.









