बेळगाव प्रतिनिधी – उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील प्रथमच लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया के.एल.ई चे डॉ.संतोष हजारे व अॅस्टर हॉस्पिटल बेंगळूरच्या डॉ. सोनल अस्थाना यांनी यशस्वी केली आहे. के.एल.ई डॉ.प्रभाकर कोरे हॉस्पिटल मध्ये हावेरी येथील 18 वर्षीय तरुणावर, 12 दिवसांपूर्वी यशस्वी लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. यापूर्वी के.एल.ई हॉस्पिटलमध्ये किडनी व हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाले आहेत. आता लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. यासाठी डॉ.अरुण व डॉ. माने व डॉ. मंजुनाथ यांचे सहकार्य लाभले. प्रथमच झालेल्या या लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबद्दल के.एल.ई चे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









