ऑनलाईन टीम / तरुण भारत :
चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्रोने आता सूर्याकडे झेप घेतली आहे. सूर्याच्या अभ्यास करण्यासाठी पीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्याने ‘आदित्य एल 1’ हे यान सूर्याकडे झेपावले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी ‘आदित्य एल 1’ चे यशस्वी प्रक्षेपण झाले.
#WATCH | Indian Space Research Organisation (ISRO) launches India's first solar mission, #AdityaL1 from Satish Dhawan Space Centre in Sriharikota, Andhra Pradesh.
Aditya L1 is carrying seven different payloads to have a detailed study of the Sun. pic.twitter.com/Eo5bzQi5SO
— ANI (@ANI) September 2, 2023
‘आदित्य एल 1’ हे यान पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे. पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल. चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास सुरू करेल. हा संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
या यानामध्ये 7 पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधील 4 पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील. सूर्य हा एक तारा आहे. त्यामुळे सूर्यावर सतत काही ना काही स्फोट होत असतात. पण या कोणत्याही स्फोटांचा परिणाम या यानावर होणार नाही. पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करेल, असे इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे.








