वार्ताहर/हिंडलगा
येथील श्री मष्णाईदेवी यात्रेची सांगता दि. 12 रोजी मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली. बुधवारी पहाटे 6 वाजता इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हिंडलगा ग्राम देवस्थान सुधारणा मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद व पुजारी उपस्थित होते. भाविकांनी इंगळ्या कार्यक्रमात भाग घेतला. यानंतर गावच्यावतीने व सुधारणा मंडळाच्यावतीने देवीची ओटी भरल्यानंतर भाविकांना ओटी भरण्यास मुभा दिली. अलीकडे गावची व्याप्ती वाढल्याने लक्ष्मीनगर, विजयनगर, सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, समर्थनगर, कलमेश्वरनगर, मांजरेकरनगर, शिवमनगर, डिफेन्स कॉलनी, गणेशपूर येथील भाविकांची गर्दी झाली होती.
वडगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच ग्राम देवस्थान सुधारणा समिती अध्यक्ष अनिल पावशे, उपाध्यक्ष मल्लाप्पा चौगुले, सदस्य गजानन काकतकर, संदीप मोरे, विनोद नाईक, मनोहर नाईक, संजय काकतकर, चंद्रकांत अगसगेकर, सुधाकर शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी यात्रा शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य केले. कर्नाटक युवा काँग्रेस पदाधिकारी मृणाल हेब्बाळकर यांनीही श्री मष्णाईदेवीचे दर्शन घेतले. अनिल पावशे यांच्या हस्ते शाल, पुष्पहार व पुजाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कमिटी सदस्यांबरोबरच ग्रा.पं. सदस्य विठ्ठल देसाई, राहुल उरणकर, गजानन बांदेकर उपस्थित होते. मृणाल हेब्बाळकर यांनी मंदिराला रंगरंगोटी करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच दै. तरुण भारततर्फे काढलेल्या यात्रा विशेषांकाचे त्यांनी कौतुक केले.









