क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूर येथे मिनी ऑलिम्पिक आंतरजिल्हा वेटलिफ्टींग स्पर्धेत बेळगावच्या युवजन क्रीडा खात्याच्या वेटलिफ्टींगपटूंनी 5 सुवर्ण, 2 रौप्य, 2 कांस्य पदकांसह घवघवीत यश संपादन केले आहे. मुलींच्या गटात अक्षरा, प्रगती पाटील, सान्वी एल. जी., वर्षा बजंत्री यांनी सुवर्णपदके, साक्षी जक्कण्णवर कांस्य, गुडिया प्रजापत व साळुंखे यांनी चौथा क्रमांक पटकाविला. तर मुलांच्या गटात तेजस सुणगारने सुवर्ण, कार्तिक अगसगेने रौप्य, देवांग मनमोडे यांनी कांस्यपदक पटकाविले. या संघाला क्रीडा विभागाचे उपसंचालक बी. श्रीनिवास, सदानंद मालशेट्टी, श्रृती स्वतीका यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









