वार्ताहर/येळ्ळूर
नेहरु स्टेडियम, येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये चांगळेश्वरी हायस्कूल, येळ्ळूरच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.या स्पर्धेत श्रेयश चांगळी यांने 60 मी. अडथळा प्रथम, सिद्धी कुगजीने 3000 मी. धावणे प्रथम, अक्षरा गुरवने 50 किलो वजनी गटात कुस्तीमध्ये द्वितीय तर विनायक बिर्जे उंचउडीमध्ये तृतिय, प्रसाद कदमने कुस्तीमध्ये द्वितीय, अनुष्का चौगुलने कराटेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवले या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर, क्रीडा शिक्षक एम. एम. डांबले, संस्थापक वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद मजुकर यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.









