वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने येथील जिल्हा क्रीडांगणावर नुकत्याच झालेल्या क्रीडा स्पर्धेतील कुस्ती प्रकारात मल्लांनी घवघवीत यश संपादन केले आहेत. या स्पर्धेत गौतम खांडेकर, प्रतिक पावशे, श्रेयश काटे या मल्लांनी चांगली कामगिरी केल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कट्टीमनी इंग्लिश माध्यम शाळेचा विद्यार्थी प्रतिक पावशेने 80 किलो वजनी गटात द्वितीय, अगसगे मराठी प्राथमिक शाळेचा विद्यार्थी गौतम खांडेकरने 57 किलो वजनी गटात प्रथम, तर महिला विद्यालय इंग्लिश माध्यामिक स्कूलची विद्यार्थी श्रेयस काटेने 51 किलोत प्रथम क्रंमाक मिळविला. त्यांना भाऊ पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत आहे.









