खानापूर : कंठीरेवा स्टेडियम बेंगळूर येथे झालेल्या सरकारी कर्मचाऱयांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खानापूर तालुक्मयातील कबनाळी शाळेचे शिक्षक बापू दळवी यांनी 67 किलो वजनी गटाच्या वेटलिफ्टिंग तसेच पॉवरलिफ्टिंग या दोन्ही क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवत लक्षवेधी कामगिरी केली. एमबीएस खानापूर शाळेचे शिक्षक तसेच खानापूर नोकर संघटनेचे खजांची जे. पी. पाटील यांनी 87 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये तृतीय क्रमांक मिळवत यशाला गवसणी घातली.
अबनाळी शाळेचे शिक्षक व तालुका शिक्षक संघटनेचे डायरेक्टर रमेश कवळेकर यांनी 60 किलो वजनी गटाच्या बॉडीबिल्डिंगमध्ये द्वितीय क्रमांक संपादन केल्यामुळे त्यांची दिल्ली येथे होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेबळी, खानापूर तालुक्मयाचे बीईओ लक्ष्मणराव एकुंडी, खानापूर नोकर संघटनेचे अध्यक्ष बी. एम. येल्लूर, बीआरसी अधिकारी ए. आर. अंबगी, अक्षरदासोह अधिकारी महेश परीट, कर्नाटक राज्य शिक्षक संघटनेचे संघटना कार्यदर्शी कृष्णा कौंदलकर, जिल्हा उपाध्यक्ष बी. बी. चापगावकर यांनी अभिनंदन केले.









