सावंतवाडी / प्रतिनिधी
मा.नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते सत्कार
Success of students of Sawantwadi School No. 6 in various competitions!
(कै.)श्रीमती लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळा नं ६ भटवाडी सावंतवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवल्याबद्दल मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षेत तिसरीच्या विद्यार्थी प्रथमेश लांबर हा 178 गुण मिळवून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ९वा येऊन तालुक्यात दुसरा आला व सुवर्णपदक पटकावले.
चौथी मधून देवेश जाधव हा 146 गुण मिळवून सिल्वर मेडल मिळविले. दुसरी मधून वैष्णवी खोसरे व शिवराज साळुंखे हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत चौथी मधून देवेश जाधव 206 गुण तर सावली पटेल ही विद्यार्थिनी 138 गुण मिळवून उत्तीर्ण झाली. चैताली पास्ते हिला 114 गुण मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका व मुख्याध्यापक श्रीमती सायली लांबर व गीता सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती अनिषा राणे, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर तसेच सावंतवाडी केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीमती समीक्षा खोचरे, बालवाडी ताई सौ. गावडे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.









