प्रतिनिधी / बेळगाव
एम. व्ही. हेरवाडकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कर्नाटक राज्य बेंगळूर ग्रेड परीक्षा 2022-23 या वर्षामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले.
केदार रायकर याने बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला तर हर्षा शानभाग, सीया सामंत, वरद साखळकर, प्रथमेश वाठारकर, इशान नाडकर्णी, सोहम गोडबोले, ओम काडापुरे, रेहा शिंदे, अनन्या सोमणाचे, दत्तगुरु धुरी या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता श्रेणी संपादन केली.
या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक सुहास काकतकर, प्राचार्य सुनील कुसाणे, उपप्राचार्य अरुण पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.









