क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खाते व बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बेळगाव शहर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत स्टँडर्ड स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.
जिल्हा क्रीडांगणावर आयोजित केलेल्या या स्पर्धेत स्वयम जुवेकरने 400, 800 व 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 3 सुवर्ण, श्रुष्टी जुवेकरने 200, 400 व 600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 3 सुवर्ण, अक्षता मजुकरने 400 व 600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 2 सुवर्ण तर 200 मी. धावण्याच्या स्पर्धेत श्रेया कोल्हापूरकरने कांस्य पदक पटकाविले. या स्पर्धेत श्रुती जुवेकर व स्वयम जुवेकर यांनी 15 गुणांसह वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. या सर्व क्रीडापटूंना स्टँडर्ड स्पोर्ट्सचे प्रमुख प्रशिक्षक प्रदीप जुवेकर, शिरीष सांबरेकर, आकाश मंडोळकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









