क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मंगळूर येथे सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे राज्यस्तरीय प्राथमिक व माध्यमिक कराटे स्पर्धेत सेंट झेवियर्स संघाच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत सेंट झेवियर्सचे कराटेपटू सान्विका काकतीकरने रौप्यपदक, शितल कडोलकरने रौप्यपदक, जोनाथन ऍन्थोनीने कास्यपदक पटकाविले. या कराटेपटूंना कराटे प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तर सेंट झेवियर्सचे मुख्याध्यापक फादर चार्ली ब्राजस, क्रीडा शिक्षक चेस्टर रोजारियो, जुलीयट यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









