संतीबस्तवाड येथील दोन शाळेच्या फुटबॉल संघांची जिल्हास्तरीय निवड
वार्ताहर/किणये
भूतरामट्टी येथील भगवान महावीर शाळा येथे तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये संतीबस्तवाड गावातील शाळेतील 14 व 17 वर्षाखालील मुलींच्या संघानी फुटबॉल संघांनी प्रथम क्रमांक मिळवत त्या दोन्ही संघाची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे. संतीबस्तवाड येथील सेंटजोसेफ विरूद्ध भगवान महावीर भूतरामट्टी सामन्यात अखेरच्या 25 व्या मिनिटाला संतीबस्तवाडच्या शाळेच्या अन्नपूर्णा किनयेकर हिने गोल मिळविला 1-0 मिळवून सेंटजोसेफ हा संघ विजयी झाला. 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल संघामध्ये संतीबस्तवाड येथील सिक्रेड हार्ट प्राथमिक शाळेच्या मुलींनी एस एफ एस उचगाव या शाळेच्या संघावर 2-0 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. या दोन्ही मुलींच्या संघांना प्रशिक्षक म्हणून सेबेस्टिंन फर्नांडिस यांचे मार्गदर्शन तर संत जोसेफच्या मुख्याध्यापिका विना बी. एस, सेक्रेट हार्टच्या टेरेजलीन बी एस, विठ्ठल तळवार यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









