Success of Shravani Gadekar of Satarda High School in VIIIth Scholarship Examination
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सातार्डा हायस्कुल च्या श्रावणी सूर्यकांत गडेकर हिने 51 टक्के गुण मिळवून ग्रामीण सर्वसाधारण यादीत स्थान मिळविले. श्रावणी हिला शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सातार्डा माध्यवर्ती संघांचे पदाधिकारी, सर्व संचालक, मुख्याध्यापक सावंत, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









