वार्ताहर/किणये
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुका पातळीवर झालेल्या मुलांच्या कबड्डी व थ्रोबॉल स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. या दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्यात मन्नीकेरी हायस्कूलचा पराभव करत मच्छे हायस्कूलच्या मुलांच्या थ्रोबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच कबड्डी खेळातील अंतिम सामना सरस्वती हायस्कूल हंदिगनूर विरूद्ध मच्छे हायस्कूल यांच्यामध्ये झाला. यामध्येही मच्छे संघाने प्रथम क्रमांक मिळविला. या दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच वैयक्तीक क्रीडा प्रकारामध्ये वेदांत पाटील याने 62 किलो कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील, क्रीडाशिक्षक पी. के. चव्हाण, संघ व्यवस्थापक अजित नाकाडी व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.









