कोकण संघात निवड झालेल्या वेंगुर्लेच्या अपुर्वा परबची उत्कृष्ट खेळी
वेंगुर्ले (वार्ताहर)-
मुंबई युनिव्हर्सिटी इंटर कबड्डी स्पर्धेत कोकण झोन संघात वेंगुर्ले बँ. खर्डेकर महाविद्यालयाची अपूर्वा सतीश परब हिची एकमेव निवड झाली होती. कोकण झोनने मुंबई युनिव्हर्सिटी कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. याबद्दल कोकण संघातील वेंगुर्लेची कन्या अपुर्वा परब हिच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला प्रदेश सचिव सौ. नम्रता कुबल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांत राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ले शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा सदस्य नितिन कुबल, सौ. श्रध्दा साटेलकर, यशराज पालकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.









