विद्यार्थ्यांनी जिंकली रनरअप जनरल चॅम्पियनशिप
प्रतिनिधी /बेळगाव
केएलएस गोगटे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एमबीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच गोवा येथील रोझरी कॉलेज ऑफ आर्ट्स ऍण्ड कॉमर्सने आयोजित केलेल्या ‘पॅसॉनिक-2022’ या राष्ट्रीय स्तरावरील फेस्टमध्ये रनरअप जनरल चॅम्पियनशिप जिंकली आहे. या फेस्टमध्ये गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातून 10 हून अधिक गट सहभागी झाले होते. श्रेयश पाटील व श्रीनिधी हुक्केरी यांना मिस्टर पॅसॉनिक व मिस पॅसॉनिकने सन्मानित करण्यात आले. ‘डेअर टू टेड’मध्ये आदर्श पाटील व नवनीत कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
अभिषेक सलगर, मानसी बडस्कर, निहाल पैठणकर, मोहम्मद अझरुद्दीन शेख, जय पाटील, प्रतीक्षा निलन्नवर, जिनेंद्र जनगौडा, विशाल मैलाके यांनी डायरेक्टर्स कट या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. अभिषेक सलगर, विशाल मैलाले, जिनेंद्र जनगौडा यांनी पिक्सेल बॅटल स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. बी प्लॅन स्पर्धेत इशिका शाह व अनुष्का बस्तवाडकर यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. जयंत कित्तूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिक्षकांनी त्यांच्यावर केलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. प्राचार्यांनी सर्वांगीण विकास करणाऱया उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात एमबीए विभाग कायम पुढे असतो, असे सांगितले. एमबीए विभागाचे प्रमुख डॉ. केएसएल दास यांनी अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना गट, वेळ व संसाधने यांचे व्यवस्थापन कसे करावे, हे शिकावयास मिळते. आपला एमबीए विभाग उद्योजकता, नेतृत्व व व्यवस्थापन अशा कौशल्यांना चालना देणाऱया संधी उपलब्ध करून देण्यात नेहमीच अग्रेसर ठरला आहे, असे सांगितले. प्रशासन समितीचे अध्यक्ष प्रमोद कथावी, केएलएस व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थ्यांनी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.









