प्रतिनिधी/बेळगाव
दावणगेरे विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्यावतीने घेण्यात आलेल्या स्टुडंट प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये बेळगावच्या केएलएस आयएमईआर कॉलेजने यश मिळविले. उत्कर्ष-2025 ही स्पर्धा नुकतीच दावणगेरे येथे पार पडली. देशभरातील विविध कॉलेजचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. कश्मा चौगुले, वैष्णवी मुस्तीगेरी यांनी 164 संघांमधून तिसरा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर बेस्ट स्पीकर म्हणून कश्मा चौगुले, आदित्य बाळेकुंद्री, राजश्री बडाचे यांना गौरविण्यात आले. कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन आर. एस. मुतालिक, संचालक डॉ. अरिफ शेख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.









