वार्ताहर /किणये
तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये किणये येथील मराठा मंडळ एस. जी. पाटील पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळविले.
विज्ञान विभाग द्वितीय वर्षातील विद्यार्थी प्रसाद मंगणी व वाणिज्य विभाग द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी नम्रता तरळे यांनी बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य आर. पी. गोडसे व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.









