वार्ताहर/नंदगड
बेनकनहळळी (ता. बेळगाव) येथे फ्लाईंग फिट कराटे असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये खानापूर व्हीएसकेएफ क्लासच्या कराटेपट्टूनी यश मिळविले. यश मिळविणाऱ्या कराटेपटूंमध्ये अधिरा चिठ्ठीने सुवर्ण, स्वराज मयेकर, स्वज्ञा बापशेट, मैथीली देसाई, विठ्ठल परब यांनी रौप्य, बलराज कळ्ळेकर, गणेश पाटील, प्रितम असोगेकर यांनी कास्य पदक मिळविले. वरील सर्व कराटेपटूंना कराटे मास्टर राहूल पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









