वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
सार्वजनिक शिक्षण खाते व जिल्हा पंचायत यांचे संयुक्त विधामाने तालुकास्तरीय सदर क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये शाळेच्या मुलींच्या कबड्डी संघाने घवघवीत यश संपादन केले. कंग्राळी बुद्रुक येथील विश्व भारत सेवा समिती संचलित गर्ल्स हायस्कूलच्या मुलींच्या कबड्डी संघाने तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवित, या मुलींच्या संघाची जिल्हास्तरीय निवड झाली आहे. सदर खेळाडूंना क्रीडा शिक्षक पी. व्ही. कदम यांचे मार्गदर्शन तसेच संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी, शाळेचे मुख्याध्यापक एन. के. पाटीलसह इतर शिक्षकांचे प्रोत्साहन मिळत आहे.









