वेंगुर्ले शाळा नं. 4 ची विद्यार्थिनी
वेंगुर्ले (वार्ताहर)-
ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा 2024-25 मध्ये वेंगुर्ले शाळा नं. 4 ची सातवी मधील विद्यार्थीनी हंसिका जगन्नाथ वजराटकर हिने वेंगुर्ले तालुक्यात व्दितीय क्रमांक पटकावला आहे. ती इस्त्रोच्या सहलीस पात्र ठरली आहे. हंसिका वजराटकर हिने बी.डी.एस. परीक्षेत गोल्ड मेडल मिळवलेले आहे. तसेच हिंदी राष्ट्रभाषा प्रवेशिका परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून इयत्ता पाचवीची ती स्काँलरशीप धारक आहे.तिच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ यांच्यातर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले.









