प्रतिनिधी / बेळगाव
शेख कॉलेज ऑफ एज्युकेशन, नेहरूनगर बेळगाव यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत एसकेई सोसायटीच्या जीएसएस महाविद्यालयाने प्रथम पारितोषिक पटकाविले. या संघामध्ये रितिका एम., सुमा के., अभिषेक ए., रंजिता के., अनंत विठ्ठल आणि अतुल के. यांचा सहभाग होता. कॉलेजतर्फे या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.









