प्रतिनिधी/ बेळगाव
गदग येथील तोंटदार्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने आयोजित केलेल्या ‘टीसीई हॅकेथॉन 2023’ स्पर्धेत बेळगावच्या जीआयटीचे विद्यार्थी ओम पाऊसकर व श्रीराम नायक यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत एकूण 85 संघ सहभागी झाले होते. मुख्य म्हणजे ही स्पर्धा सलग 24 तास सुरू होती.
ओम आणि श्रीराम यांनी ‘हेल्थकेअर’ हा विषय घेऊन डॅशबोर्ड सादर केला. त्यांच्या या प्रकल्पाला 85 संघांमधून प्रथम क्रमांक देण्यात आला. या यशाबद्दल प्राचार्य व विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.









