राष्ट्रीय स्पर्धेसाठी सात खेळाडूंची निवड
बेळगाव : बेंगळूर येथे शिक्षण खात्यातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय प्राथ.-माध्य. जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी घवघवीत यश संपादन करीत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. बसवणगुडी, अॅक्वेटिक सेंटर, बेंगळूर येथे घेण्यात आलेल्या या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरियस क्लबच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे. अमन सुणगारने 3 सुवर्ण, 1 कांस्य, सार्थक श्रेयकर 2 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य, यशराज पावशेने 1 सुवर्ण, 1 रौप्य, 2 कांस्य, लावण्या आदिमनीने 1 सुवर्ण, 2 रौप्य, समीक्षा घसारीने 4 रौप्य, अभिनव देसाईने 1 रौप्य, 1 कांस्य, चैत्राली मेलगेने 1 रौप्य, 1 कांस्य, आर्यवंश गायकवाड 1 रौप्य, खुशी हेरेकरने 3 रौप्य तर अर्णव निर्मळकरने 1 कांस्यपदक पटकाविले. अमन सुणगार, सार्थक श्रेयकर, यशराज पावशे, लावण्या आदिमनी, समिक्षा घसारी, अभिनव देसाई व चैत्राली मेलगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. वरील सर्व जलतरणपटूंना प्रशिक्षक उमेश कलगटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितिश कुडूचकर, गोवर्धन काकतीकर व इम्रान उजगावकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.









