स्मरणला पाच पदके, धवलला सुवर्ण
बेळगाव : म्हैसूर दसरा राज्य जलतरण स्पर्धेत अबा व हिंदी स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूनी 15 पदके संपादन करून घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत स्मरण मंगळूरकर याने तीन रौप्य व दोन कांस्य पदके असे एकूण पाच पदके मिळविली. धवल हनमन्नावरने एक सुवर्ण व एक कास्य पदक पटकावले. चिन्मय बागेवाडीने एक रौप्य, एक कास्य, वरूण धामणकर एक रौप्य, आदी शिरसाठ एक रौप्य, स्वयं कारेकर एक कास्य, सामिया मेणसे एक रौप्य, दोन कास्य, वैशाली घाटेगस्तीने एक कास्य पदक पटकाविले. वरील सर्व जलतरणपटूंना प्रशस्तीपत्र मेडल्स व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. वरील सर्व जलतरपटू गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये व हिंद जलतरण तलावामध्ये नियमितपणे सराव करत असून त्यांना जलतरन प्रशिक्षक विश्वास पवार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभते.









