बेळगाव : म्हैसूर येथे युवजन क्रीडा खाते व युवा महिला सबलिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा महोत्सवानिमित्त आर्म रेसलिंग स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे. म्हैसूर येथील चामुंडेश्वरी इंडोर मैदानात घेण्यात आलेल्या आर्म रेसलिंग स्पर्धेत रविंद्र जमादार याने सुवर्णपदकासह नवचैतन्य थारे किताब पटकाविला. तर महिलांच्या गटात आरती पवारने सुवर्ण, कमल किटवाडकरने रौप्य, नागराज कुरबरने रौप्य, तर दिनेशने सहभाग घेतला होता. स्पर्धेनंतर महिला पोलीस अधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदके, प्रमाणपत्र, रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
Previous Articleगोमटेशचे खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
Next Article राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेला प्रारंभ









