बेळगाव :
टिळकवाडी फिमेल एज्युकेशन सोसायटी संचालित बालिका आदर्श विद्यालयाच्या मुलींनी सरकारच्या नॅशनल मिन्स कम मेरीट स्कॉलरशीप (एनएमएमएस) परीक्षेत घवघवीत यश मिळविले. इयत्ता आठवीसाठी सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत सृष्टी गंथडे, प्राची मुचंडीकर आणि सृष्टी देसाई उत्तीर्ण झाल्या आहेत. प्रतिवर्ष 12 हजारप्रमाणे पुढील पाच वर्षांची शिष्यवृत्ती त्यांनी पटकावली आहे. त्यांना चेअरमन प्रा. आनंद गाडगीळ यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.









