1 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कास्य पदकांची कमाई
बेळगाव : गोवा येथील मडगाव एफएफएल निमंत्रितांच्या तिसऱ्या आंतरराज्य वयस्करांच्या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा स्पोर्ट्स क्लबचे जलतरणपटूंनी एक सुवर्ण, तीन रौप्य, दोन कास्यपदक पटकावित यश संपादन केले आहे. मडगाव येथील सदा जलतरण तलावात झालेल्या निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा क्लबचे जलतरणपटू अरूण नामदेव जाधव यांनी 45 वयोगटात 50 मी. फ्रीस्टाईल स्पर्धेत सुवर्णपदक, 50 मी. ब्रेस्टोकमध्ये रौप्यपदक तर 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकाविले. 45 वयोगटातील मुकेश मधूकर शिंदे याने 50 मी. फ्रीस्टाईल व बॅकस्ट्रोकमध्ये दोन रौप्य पदक तर 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये कास्यपदक पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या दोघांना जलतरण एनआयएस प्रशिक्षक विश्वास पवार यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.









