क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
इंद्रलिस स्कूल ऑफ चेस हुबळी आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत बेळगाव येथील गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धिबळपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.
हुबळी येथे झालेल्या इंद्रलिस खुल्या ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत प्रशांत अणवेकरने पहिला क्रमांक पटकावला. साई मंगनाईकने 8 वे, अक्षत शेटवालने 13 वे तर सक्षम जाधवने 15 वे स्थान पटकाविले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत प्रशांत अणवेकरने पाचवे स्थान मिळविले. मुलांच्या विभागात 9 वर्षाखालील वयोगटाकरिता घेण्यात आलेल्या स्पर्धेत गीतेश सागेकरने पहिला, नील मंगनाईकने दुसरा तर अथर्व पाटीलने चौथा क्रमांक पटकावला. 11 वर्षांखालील गटात अद्वैत भट्टने चौथा क्रमांक पटकावला. 13 वर्षांखालील गटात साई मंगनाईकने पहिला तर शिवु नागराजने तिसरा क्रमांक मिळविला. 16 वर्षांखालील गटात निश्चल सखदेवने पहिला तर अक्षत शेटवालने दुसरा क्रमांक मिळविला.
मुलींच्या विभागात 13 वर्षांखालील गटात वैष्णवी व्ही. ने दुसरा तर दर्शिता कुडतुरकरने चौथा क्रमांक व 16 वर्षांखालील गटात वैभवी भट्टने दुसरा तर तनिष्का हिरेमठने चौथा क्रमांक पटकाविला. विजेत्या बुद्धिबळपटूंना गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीचे प्रशिक्षक प्रशांत अणवेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









