संकटे, अडचणी, आव्हानांना सामोरे गेलो जनतेच्या बळावर : डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षांची कारकिर्द,यशाबद्दल ‘तरुण भारत’शी मनमोकळेपणाने साधला संवाद
तो दिवस होता 19 मार्च 2019. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याचा नवा मुख्यमंत्री कोण असावा? हा प्रश्न होता. गोव्यात भाजपला पूर्ण बहुमत नव्हते. मगो, गोवा फॉरवर्ड आणि तीन अपक्षांचा टेकू घेऊन सरकार चालवायचे होते. त्यातच मगो व गोवा फॉरवर्ड नेत्यांनी भाजपने निवडलेल्या व्यक्तीला विरोध करावयाचे ठरविलेले. सर्वांची समजूत घालताना नितीन गडकरी यांची पुरती दमछाक झालेली. एका बाजूने पर्रीकरांची चिता जळत होती, तर दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्रीपदावऊन भाजप आघाडीतील आमदारांची खलबते सुरु होती. अखेरीस ऊसवे फुगवे झुगाऊन भाजपने सभापती डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली. एक मोठे आव्हान समोर घेऊन डॉ. प्रमोद सावंत यांनी हे पद स्वीकारले. गोव्याच्या राजकारणासमोर काय वाढलेले आहे, माहीत नव्हते. मुख्यमंत्रीपदी किती दिवस राहणार, माहीत नव्हते. अनेक ज्येष्ठांसमोर अद्याप पन्नाशीपर्यंत देखील पोहोचले नसताना हे पद आपल्याला मिळतेय. मनोहर पर्रीकर व आपल्यामध्ये जनता तुलनात्मकदृष्ट्या विचार करतील. हे विचार मनात येऊन गेलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे येत्या 19 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची 5 वर्षे पूर्ण करीत आहेत. डॉ. सावंत म्हणजे बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री जो 5 वर्षे पूर्ण करणारा पहिलाच मुख्यमंत्री ठरला!
सागर जावडेकर /पणजी
आपल्याला सातत्याने जनतेमध्ये राहायला आवडते. जनतेला विचारात व विश्वासात घेऊन व सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात आपल्याला कमालीचा आनंद मिळतो. त्यामुळे छोटे राज्य असून देखील कामाची व्याप्ती मात्र तेवढीच व्यापक आहे आणि त्यासाठी आपण दिवसाचे 18 तास जनसेवेत खर्च कऊन देखील कोणता थकवा ना कोणता शीण. उलटपक्षी कामाचा प्रत्येक क्षण आपण आनंदात घालवितो… मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. त्यांच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास बळावलेला. आपल्याला पुढील विधानसभा निवडणुका जिंकून पुन्हा राज्याचे नेतृत्व करायची इच्छा आहे. एवढ्यात केंद्रीय राजकारणात प्रवेश करण्याची मुळीच इच्छा नाही, ते म्हणाले.
पाच वर्षे पूर्ण करणारा बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री
डॉ. प्रमोद सावंत येत्या 19 मार्च रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीची 5 वर्षे पूर्ण करीत आहेत. 1980 पासूनच्या गोव्यातील बदलत्या राजकारणात बिगर काँग्रेसी नेता ज्याने मुख्यमंत्रीपदाची 5 वर्षे पूर्ण केली, असा पहिला नेता म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांचा उल्लेख करावा लागेल.
हो भुरगो मरे!
47 व्या वर्षी हे पद स्वीकारल्यानंतर डॉ. सावंत यांची परिस्थिती थोडी वेगळीच होती. हो भुरगो मरे! तो काय आम्हाला शहाणपण सांगणार? ही भावना मगो, गोवा फॉरवर्ड या दोन पक्षाच्या नेत्यांचीच होती असे नव्हे, तर भाजपच्या नेत्यांमध्ये देखील होती. परिस्थिती कठीण आहे, प्रसंग बाका आहे, मात्र मागे सरायचे नाही असे ठरवून डॉ. प्रमोद सावंत यांनी ही मोठी जबाबदारी आनंदाने स्वीकारली.
राज्य प्रथम…
डॉ. सावंत म्हणतात, मुख्यमंत्रीपद कसे सांभाळायचे? सरकारमध्ये अनेक ज्येष्ठ नेते आहेत जे चार चार वेळा, पाच पाच वेळा निवडून आलेले. मी दुसऱ्यांदा निवडून आलेलो. थेट मुख्यमंत्रीपद! मात्र आव्हान स्वीकारले. ‘राज्य प्रथम’! या न्यायाने काम सुऊ केले. आर्थिक परिस्थिती नाजूक बनलेली, मात्र केंद्र सरकारकडून विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून उदंड प्रतिसाद व पाठबळ मिळाले. गोव्याला कधी नव्हे एवढे बळ पायाभूत सुविधांसाठी मिळाले. मोठा विकास गोव्याने केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून केला.
‘स्वयंपूर्ण’चे पंतप्रधानांकडून कौतुक
पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेचे तंत्र घेऊन स्वयंपूर्ण गोवा योजना तयार केली. ती साऱ्या जनतेपर्यंत पोहोचली आणि गोव्याने त्या माध्यमाद्वारे केलेली प्रगती हा चर्चेचा व कौतुकाचा विषय बनला. पंतप्रधानांनी अनेकवेळा गौरवोद्गार काढले व देशातील अनेक राज्यांना गोव्यात जाऊन योजना कशी केलीय त्याचा अभ्यास करा व त्याचे अनुकरण करा, असे जेव्हा सांगितले त्यावेळी हा आपला व गोव्याचा सर्वात मोठा विजय आहे असे आपल्याला वाटले.
शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविल्या योजना
मुख्यमंत्री या नात्याने आपण अनेक योजना, प्रकल्प राबविले मात्र रोजगार, स्वयंपूर्णता, मानव संसाधन, पायाभूत सुविधा या क्षेत्रात आपण जे प्रयत्न केले ते सर्व यशस्वी ठरले. त्यातूनच वीज क्षेत्र असो, किसान व्रेडीट कार्ड, किंवा जलवितरण असो. विविध सामाजिक विकास योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत उपलब्ध कऊन देण्याच्या प्रयत्नांत यशस्वी झालो…. डॉ. प्रमोद सावंत हे अत्यंत मनमोकळेपणाने बोलत होते. दैनिक ‘तऊण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर हे देखील मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवेळी उपस्थित होते. गोव्याला युवा मुख्यमंत्री लाभला. त्याने 5 वर्षांची कारकीर्द यशस्वी कऊन दाखविली हे आज केंद्राचे म्हणणे आहे.
‘ज्युनियर’ असूनही आव्हान पेलले
गोव्यातील साऱ्या जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यात सुऊवातीची अडीच वर्षे गेली. पर्रीकरांचे निधन, नाजूक आर्थिक परिस्थिती, त्यातच कोविडची साथ. एका पाठोपाठ एक संकटे हात धुवून मागे लागलेली. त्यातच ज्येष्ठांनी टार्गेट केलेले. या सर्व संकटांवर मात करताना आपली खरी तर कसोटीच होती, मात्र प्रत्येक आव्हान आपण ‘ज्युनियर’ असून देखील पेलले. परिणामी आता सर्वांनीच आपल्याला स्वीकारले.
ज्येष्ठांच्या खांद्यावर हात टाकू शकत नाही
ज्येष्ठ नेत्यांच्या खांद्यावर आपण हात टाकू शकत नाही. परंतु, त्यांचे आशीर्वाद अवश्य घेऊ शकतो. आपल्याला ते काही सूचनाही करतात. गरज पडेल त्यावेळी सल्लेही देतात. जास्तीत जास्त ज्येष्ठांना घेऊन आपण गेली 5 वर्षे सरकार चालवितोय. त्यात आपल्याला कोणतेही कष्ट पडत नाही… डॉ. प्रमोद सावंत आपले अनेक अनुभव विषद करीत होते.
गोमंतकीयांचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ वाढविण्यात यशस्वी
अनेक संकटांशी सामना करीत असताना राजकीय पेच प्रसंगानाही तोंड देत सरकारचा पाया मजबूत केला आणि विकासाचे नेमके उद्दिष्ट समोर ठेवले. त्यापैकी 70 ते 80 टक्के प्रकल्प पूर्ण केले आहेत. यातून गोमंतकीय जनतेचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ वाढविण्याचा सातत्याने प्रयास केला व त्यात निश्चित यश प्राप्त झाले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नारी, युवा, किसान, गरीब याकडे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपल्याला मार्गदर्शन सातत्याने लाभले. नारीशक्ती, युवाशक्ती, किसानशक्ती आणि गरिब कल्याण या चार मुद्यांवर आम्ही जास्त लक्ष केंद्रीत केले. जनतेसाठी कॉल सेंटर सुऊ केले. सामाजिक क्षेत्रात ज्या काही योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. या संदर्भात आम्ही डेटा गोळा करतो व त्यातून आम्ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात की नाही यावर बारकाईने लक्ष ठेवतो.
पर्रीकरांशी आपली तुलना होऊ नये
एका प्रश्नावर उत्तर देताना डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, मनोहर पर्रीकर हे आमचे ज्येष्ठ व फार मोठे नेते होते. आपली त्यांच्याशी तुलना होऊ नये. आपल्याला कल्पना होती, आपली त्यांच्याशी तुलना करतील व वाट्टेल ते काहीजण चर्चा करतील. मात्र राजकारणात येऊन आपण स्वत:ची अशी एक प्रतिमा तयार केली.
शाळेतील मुलेही आपल्याला ओळखतात…
जनतेमध्ये जायला आवडते, जनतेसाठी द्वारे नेहमीच खुली ठेवतो. आपल्याला कोणीही संपर्क कऊ शकतो. आपण अनेक ठिकाणी फिरतो. शाळेमध्ये जातो. शाळेतील मुले डॉ. प्रमोद सावंत असे जेव्हा म्हणतात व मला ओळखतात, ही आपल्याबद्दल असलेली आपुलकी आहे. त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते.
हा जनतेचा आपल्यावरील विश्वास
आज गोमंतकीय जनतेने आपल्याला मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर तीन-चार वर्षांचा कालावधी गेल्यानंतर स्वीकारले आहे. नव्या नेतृत्वास गोमंतकीयांनी संधी दिली. त्यामुळेच 2022 च्या निवडणुकीसमोर अनेक आव्हाने असताना देखील भाजप विजयी झाला. आपल्याला वाटते हा माझ्या नेतृत्वावर जनतेने ठेवलेला विश्वास आहे… डॉ. सावंत यांनी हे विचार व्यक्त केले.
जनतेत राहाण्यात आनंद मिळतो
दिवसाचे 18 तास काम कऊन देखील आपण थकत नाही याचे श्रेय ते गोमंतकीय जनतेला देतात. आपल्याला जनतेबरोबर राहण्यात आनंद मिळतो. आपण वैयक्तिक पातळीवर कोणाच्याही विरोधात नसतो व नाही. विरोधी पक्षाचे आमदार देखील आपले चांगले मित्र आहेत. त्यांच्याही मतदारसंघात तेवढ्याच गतीने विकासकामे करतो, जेवढी सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात करतो.
स्मित हास्यामुळे अनेक कामे होतात
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कधीही कोणत्याही संकटांचा सामना करताना नेहमीच प्रफुल्लीत असतात. चेहऱ्यावरील स्मित हास्याचे रहस्य सांगताना डॉ. सावंत म्हणाले की, तेवढी एक चांगली मालमत्ता आपल्याकडे आहे. एका स्मित हास्याने तुमची अनेक कामे होत असतात. जनतेला देखील तेवढाच आनंद मिळतो.
‘जनरेशन गॅप’ असले तरी वातावरण मोकळे
आपल्या सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्यात व आपल्यामध्ये ‘जनरेशन गॅप’ असला तरी आज वातावरण मोकळे आहे. आपण त्यांच्याकडे जातो ते आपल्याकडे येतात. सर्व मंत्री मित्रत्वाच्या नात्याने आपल्याशी वागतात. त्यातूनच आपण आव्हानात्मक पाच वर्षे पूर्ण कऊ शकलो. गेल्या 5 वर्षांत जनतेने दिलेला आशीर्वाद उपयुक्त ठरला.
संधी असली तरीही केंद्रात जाण्याची इच्छा नाही
आपल्याला राष्ट्रीय पातळीवर अनेक कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी केंद्रीय नेत्यांमुळे मिळते. त्यातून आपली राष्ट्रीय पातळीवर जरी प्रतिमा निर्माण होत असली तरी देखील 2027 ची निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली जिंकायची आहे व पुन्हा मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची इच्छा आहे. केंद्रात जाण्याची मुळीच इच्छा नाही.
नवी राजकीय पिढी निर्माण होण्याची गरज
गोव्यात आता नवी राजकीय पिढी निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान 10 ते 15 वर्षे तरी सामाजिक कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे. आपण ग्रामपातळी, तालुका पातळीवर जाऊन समाजसेवा केली व त्यातून आज या पदावर पेहोचलो. या पदावर राहून आपल्याला मुळीच त्याचा गर्व नाही, मात्र गोव्याचा मुख्यमंत्री एवढा अभिमान जनतेच्या आशीर्वादामुळे नक्की आहे. काम केल्यानेच ही संधी युवा वयात मिळाली. गोव्यात अशाच पद्धतीने नवी पिढी समाजकारणात व राजकारणात यावी, एवढी इच्छा मनात आहे. अजून बरेच कार्य आपल्याला करावयाचे आहे. जनतेचा आशीर्वाद हे बलस्थान मानून आपण एक पाऊल पुढे टाकतोय, डॉ. सावंत म्हणाले.
- सलग पाच वर्षे पूर्ण करणारे बिगर काँग्रेसी पहिले मुख्यमंत्री
- ‘हो भुरगो मरे’ भावना मगो, गोवा फॉरवर्ड अन् भाजपातही
- ‘राज्य प्रथम’ मानल्याने संकटकाळात लाभली जनतेची साथ
- पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाने वाढला काम करण्याचा हुरुप
- मंत्रिमंडळात ‘जनरेशन गॅप’ असले तरीही मोकळे वातावरण
- योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी 18 तास काम
- महिला, युवा, गरीब, किसान यांच्याकडे देतोय अधिक लक्ष
- जनतेत राहिल्यामुळे ना जाणवतो थकवा, ना कसला शीण
- मुलेही डॉ. प्रमोद सावंत म्हणून ओळखतात हा अत्यानंद
- स्मित हास्य ही आपल्याकडील चांगली मालमत्ता असावी