वारणा उद्योग समूहास भेट; आ. कोरे यांच्या मागणीला ना. विखे यांचा प्रतिसाद
वारणानगर / प्रतिनिधी
गत चार वर्षात सातत्याने नद्यांना येणाऱ्या महापूरामुळे अनेक गावांत कुंटूंबाचे स्थलांतर करावे लागते. यामुळे प्रशासनावर ताण येऊन खर्च वाढतो. यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी पूरबाधीत गांवाचे स्थलातर योग्य पध्दतीने होण्यासाठी पथदर्शी आराखडा सादर करण्याचे आदेश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना दिले.
ना. विखे पाटील यानी अज रविवार दि. २१ रोजी वारणानगर ता. पन्हाळ येथील वारणा उद्योग समुहाला भेट दिली. कारखान्याच्या विश्रामगृहावर त्यांचा आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यानीही ना. विखे पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी आ. कोरे यानी पूरबाधित गावातील कुंटूबाना गावठाणमधील रिकामी जागा देण्यात यावी. तसेच पूर बांधीत कुटूंबे पूरात ग्रस्त जागा शासनास देण्यास तयार आहेत. काही गावात गावठाणात अतिक्रमणे आहेत शासन धोरणाप्रमाणे त्याचा निर्णय होईल, परंतु पूरबाधीत कुंटूबाचे पूनर्वसन होणे गरजेचे आहे. अशी मागणी ना. विखे पाटील यांच्याकडे आ. कोरे यांनी तर करवीर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील पूरबाधीत गावाची परस्थिती खा. धनजय महाडिक यांनी मांडली. या मागणीला प्रतिसाद देत ना. विखे पाटील यांनी आराखडा सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
नवे पारगांव ता. हातकंणगले गावास मंजूर असलेले पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल पदाची भर्ती तात्काळ करावी अशा मागणीचे निवेदन प्रदीप देशमुख यानी तर वाठार, ता. हातकंणगले येथे मंडल कार्यालय इमारत होण्यासाठी महेश शिंदे यानी निवेदन दिले. वारणानगर जवळच असलेल्या निलेवाडी ता. हातकणंगले गाव पूरात पूर्ण बाधीत होते. या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी जागा उपलब्द करून देण्याची मागणी आ. कोरे यानी यावेळी लावून धरली.
जिल्ह्यात पूरापासून संरक्षण होण्यासंदर्भात शिरोळ तालुक्याचा पथदर्शी आराखडा केला आहे. तसाच इतर बाधित गावाचा आराखडा तयार करून सादर करण्याचे काम पूर्ण केले जाईल असे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यानी सांगताच पूरबाधीत गावे ज्या तालुक्यात येतात तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक घेवून आराखडा तयार करण्याची सूचना ना. विखे- पाटील यांनी दिली.
वारणा साखर कारखान्याच्या शेतकरी भवनाच्या प्रांगणातील वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांच्या समाधीस ना. विखे पाटील यानी अभिवादन करून स्व. तात्यासाहेब यांच्या सहकार शिल्पातील पूर्ण कृती पुतळ्याची माहिती घेतली.
यावेळी खा. धनजंय उर्फ मुन्ना महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम (दादा), कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, वारणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. भगत, सेक्रेटरी बी.बी. दोशींगे, संचालक प्रदीप तोडकर, सुरेश पाटील,दलितमित्र अशोकराव माने, पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी, ल्हसिलदार रमेश शेंडगे यासह अधिकारी, कर्मचारी वारणा समूहातील पदाधिकारी उपास्थित होते.