सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी कोल्हापूर येथील सहाय्यक संचालक सुभाष चौगुले यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार हाती घेतला आहे. श्री चौगुले हे यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी शिक्षण विभागात काम केले आहे. तसेच चार महिने माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून प्रभारी काम केले आहे. या जिल्ह्याचा त्यांना अनुभव आहे.









