सुभेदार मनोज सावंत यांनी घेतले अमेरिकेतल्या युद्ध कौशल्याचे प्रशिक्षण
संतोष सावंत , सावंतवाडी
भारत आणि अमेरिका हे दोन देश प्रगतशील देश म्हणून ओळखले जात आहेत . अशा या दोन देशांमधील सैन्य दलातील युद्ध कौशल्याबाबत अभ्यास केला जात आहे . त्यासाठी दोन्ही देशातील सैनिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. भारतीय सैन्य दलातील जवळपास साडेतीनशेहून अधिक सैनिकांनी 25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीसाठी अमेरिकेत युद्ध कौशल्य अभ्यास याचे ट्रेनिंग घेतले आहे. आणि जवळपास भारतीय सैनिक अमेरिकेतील युद्ध अभ्यास प्रशिक्षण घेऊन परतले आहेत. या अमेरिकेतील सैन्य दलातील युद्ध अभ्यासासाठी कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कोलगावचे सुपुत्र असलेले सुभेदार मनोज प्रकाश सावंत यांची विशेष निवड झाली होती. त्यामुळे अमेरिकेतील युद्ध अभ्यासामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्राने आपला डंका मिरवला आहे. त्यामुळे परदेशात आणि जगात अमेरिकेसारख्या देशात भारतीय सैनिकांनी दलातील युद्ध कौशल्य दाखविले. आणि तेथील युद्ध कौशल्यांचा अभ्यासही केला आहे. परदेशात जाऊन त्या देशाचे युद्ध कौशल्य अभ्यास करणारे सुभेदार मनोज सावंत हे सिंधुदुर्गातले पहिले सैनिक ठरले आहेत. दर दोन वर्षांनी अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये युद्ध कौशल्य अभ्यासासाठी दोन्ही देशांच्या जवानांची तुकडी पाठवण्यात येते. यंदा चार मराठा इन्फंट्री बटालियनचे जवळपास 180 जवान व अन्य बटालियनचे असे मिळून 360 जवान अमेरिकेच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये डेहराडून चार मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे सुभेदार मनोज सावंत यांचा या युद्ध अभ्यासासाठी समावेश होता. 14 दिवसाच्या या प्रशिक्षणात अमेरिकेत अलास्का या प्रांतात या युद्ध सरावाला सुरुवात करण्यात आली होती. कठीण असे हे अमेरिकेतील हे प्रशिक्षण युद्ध कौशल्य 14 दिवसांचे होते. भारतीय सैन्य दलाची 350 जणांची जवानांची तुकडी आता आपल्या देशात येण्यास निघाली आहे. कठीण अशा या अमेरिकेच्या युद्ध सैन्य कौशल्याचा प्रशिक्षण सुभेदार मनोज सावंत यांनी घेतले आहे. यामुळे सिंधुदुर्ग वासियांची मान अधिकच उंचावली गेली यात शंका नाही .









