उन्हाळ्यात सतत काहीतरी थंडगार प्यावेसे वाटते. अशावेळी कोल्ड्रिंक्स,सरबत तर सर्वचजण ट्राय करता. पण या व्यतिरिक्त टेस्टी आणि रिफ्रेशिंग असणारं पेय म्हणजे जलजीरा. उन्हाळ्यात जलजीरापेक्षा चांगले पेय असूच शकत नाही. लिंबू आणि पुदिन्याने बनवलेले हे ड्रिंक तुमचे मन ताजेतवाने करेल. एवढेच नाही तर हे पेय पोटासाठीदेखील फायदेशीर आहे. आज आपण जलजीरा कसा बनवतात हे जाणून घेऊयात.
साहित्य
२ मोठे चमचे भाजलेले जीरे, १ लहान चमचा आमजूर पावडर, २ मोठे चमचे ताजे पुदिन्याचे पानं, अर्धा चमचा कोथिंबीर, २ मोठे चमचे लिंबाचा रस, सोडा अर्धा लीटर, आवश्यकतेनुसार बर्फाचे तुकडे आणि गार्निशसाठी लिंबाच्या फोडी.
कृती
जलजीरा बनवण्यासाठी सर्वप्रथम जीरे, काळे मीठ आणि आमचूर पावडर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. पुदिना आणि कोथिंबीरमध्ये पुरेसे पाणी घालून बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्या. आता यात बारीक केलेला मसाला आणि लिंबाचा रस टाका. दोन मोठ्या ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका. हे तयार केलेले लिक्विड दोन्ही ग्लासमध्ये टाका आणि नंतर सोडासोबत टॉप करा. मिक्स करून लिंबाच्या स्लाइसने गार्निश करून लगेच सर्व्ह करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









