उन्हाळ्यात गरमीमुळे आपल्याला हवी स्टाईल करता येत नाही.पण उन्हाळ्यात कूल लूकसाठी ओव्हर साइज शर्ट किंवा टी शर्ट हे उत्तम पर्याय आहेत. हे फक्त कम्फर्टेबल नाहीत तर खूप स्टायलिश सुद्धा दिसतात. सध्या ओव्हरसाईझ कपड्यांचा ट्रेंड देखील वाढत चाललायं. जर तुम्हाला सुद्धा ओव्हर साइज कपडे घालायला आवडत असतील, तर या टिप्स फॉलो करा आणि हटके लूक मिळवा.
उन्हाळ्यातील संध्याकाळसाठी शॉर्ट्स सोबत ओव्हर साइज्ड टॉप हे बेस्ट आहे. ओव्हर साइज शर्टसोबत कोणतीपण डेनिम शॉर्ट घाला आणि हील्स कॅरी करा.
टी शर्टला ड्रेस सारखं कॅरी करता येते. याला मॅचिंग शूसोबत पेअर करा आणि लूकला मोनोक्रोमॅटिक बनवा. तुम्ही वेस्टर्न बूट्सचा ऑप्शन देखील निवडू शकता. .
तुमचा ओव्हर साइज शर्ट किंवा टी – शर्ट जीन्ससोबत पेअर करा. हा लूक तुम्ही बूट्स, स्नीकर्स किंवा हील्ससोबत पूर्ण करू शकता. ब्रंच, डेट नाइट किंवा ऑफिससासाठी हा लूक उठून दिसेल.
जर तुम्हाला तुमचा बटन – डाउन आउटफिटला थोडे अजून इंटरेस्टिंग बनवायचे असेल तर एका खांद्याच्या बाजूने बाही खाली सरकवा. मोत्याचे हार, ड्रॉप इयररिंग्स सोबत तुम्ही फॅन्सी फुटवेअर पेअर करू शकता.
कधी कधी आपल्याला वरून खालच्या बाजूला बॅगी जायची इच्छा असते. हा स्पेशल स्टायलिंग ऑप्शन खूप आरामदायी असतो. तसेच उन्हाळ्यात खूप रिलॅक्सिंग देखील वाटतो. स्लिप – ऑन स्नीकर्स सोबत तुम्ही हा लूक स्टाइल करू शकता.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









