म्हापशातील जागृत नागरिकांनी घटना मोबाईलमध्ये कैद केल्याने स्टंटबाजीचा उलगडा : अधीक्षक निधीन वाल्सन यांनी केली त्वरित कारवाई
म्हापसा : कारगाडीचे दरवाजे उघडे ठेवून रात्री 12.30 वाजण्याच्या दरम्यान पर्वरी ते पणजी दरम्यान स्टंटबाजी करून वाहन भरवेगाने हाकताना म्हापशातील जागृत नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद करून त्याची माहिती तऊण भारतला दिल्यावर या व्हिडिओची माहिती पोलीस अधीक्षक उत्तर गोवा निधीन वाल्सन यांना पाठविल्यावर त्याची दखल अधीक्षकांनी त्वरित घेत या प्रकरणी दोघां इसमांना अटक करून ती कार जप्त करण्यास पर्वरी पोलिसांनी यश मिळविले. हा प्रकार मात्र दिवसभर राज्यातील सर्व प्रमुख चॅनलवर व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले. या स्टंटबाजी प्रकरणात फाहिद हामजा (37) या कारचालकास पोलिसांनी अटक केली. तो मुळचा शिवानंद नगर, धारवाड-कर्नाटकचा रहिवासी. त्याच्याविरोधात भादंसंच्या 279, 336 व मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 (फ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर कार मालकावर दंडात्मक कारवाई केली. रविवारी मध्यरात्री सुमारास जीए 03-सी-9203 सुझुकी रीट्ज या गाडीतून प्रवास करणाऱ्यांनी गाडीचे तीन दरवाजे उघडे ठेवून मॉल दी गोवा ते ओ-कोकेरो सर्कलपर्यंतच्या मार्गावर सदर कार बेजबाबदारपणे चालविली. ओ-कोकेरोच्या वाहतूक सिग्नलकडून वळसा घेताना सुद्धा या कारचे तीनही दरवाजे व्हिडिओत उघडेच दिसताहेत. या वाहनाच्या मागून येणाऱ्या जागरूक प्रवाशांकडून हा स्टंटबाजीचा व्हिडिओ रिकॉर्ड करून तो माध्यमांच्या प्रतिनिधींना तसेच पोलिसांना पाठविण्यात आला. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत आम्ही संशयित कार चालकास अटक केली तर कार मालकावर दंडात्मक कारवाई (चलन) केली. संशयित हा पर्यटक असून त्याने ही खासगी गाडी रेंटवर घेतली होती का? याची चौकशी सुरू आहे. याशिवाय सदर कारचालक दाऊच्या नशेत होता का? हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.
चार अल्पवयीन गाडीमध्ये होते? एकटा गाडी हाकत होता
दरम्यान म्हापशातील एक जागृत नागरिक सिद्धार्थ मांद्रेकर आपल्या कुटुंबियांसमवेत पणजी येथे जात असता त्यानी अचानक समोरून कार आपली चारही दारे खुली करून जाताना पाहिली असता त्यानी हा स्टंटबाजीची चित्रिकरण आपल्या मोबाईलमध्ये रात्री 12.30 वाजता कैद केला व हा व्हिडिओ त्वरित तऊण भारतला पाठवून दिला. तऊण भारतने हा प्रकार अधीक्षक निधीन वाल्सन यांना पाठवून दिला असता सकाळ होण्यापूर्वीच या गाडीला व संशयिताना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. दरम्यान मिळआलेल्या माहितीनुसार या कारगाडीमध्ये चार अल्पवयीन मुले होते पैकी एकटा चालवित होता. याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे अशी माहिती प्रत्यक्षदर्शनीने दै. तऊण भारतला दिली.









