ब्राह्मोस, आकाश क्षेपणास्त्रांची कहाणी
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला जेरीस आणणाऱ्या ब्राह्मोस आणि आकाश क्षेपणास्त्रांच्या शौर्याची गाथा शालेय मुले शिकणार आहेत. शिक्षण मंत्रालय लवकरच याची कहाणी सर्व भारतीय भाषांमध्ये शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या तयारीत आहे. शाळांमध्ये मुलांपर्यंत या कहाण्या पोहोचविल्या जाणार आहेत.
ब्राह्मोस आणि आकाशची शक्ती आमच्या शिक्षण व्यवस्थेच्या मजबुतीचा पुरावा असल्याचे शिक्षणमंत्री प्रधान यांनी म्हटले.
आकाश आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्रांविषयी विद्यार्थ्यांना शिकविण्यात आल्याने राष्ट्रीय हितांशी संबंधित कल वाढणार आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातही मुलांमध्ये शालेय स्तरापासूनच अशाप्रकारचे बीजारोपण करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
चांद्रयानाच्या यशाची कहाणी मुलांदरम्यान ज्या रंजक पद्धतीने पोहोचविण्यात आली, ते पाहता ब्राह्मोस आणि आकाश क्षेपणास्त्रांच्या यशाची कहाणी मुलांदरम्यान पोहोचविली जाणार आहे. या क्षेपणास्त्रांनी कशाप्रकारे पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा भेदून त्याचे वायुतळ आणि दहशतवादी अ•s नष्ट केले हे मुलांना सांगण्यात येणार आहे. या क्षेपणास्त्रांचा प्रहार जबरदस्त असल्याने पाकिस्तान काही तासांमध्येच नरमला आणि शांततेची आर्जवं करू लागला होता.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र
वेग-9898 किमी/प्रतितास, मारक पल्ला-400 किमी, वजन-1290 किलोग्रॅम, लांबी-8.4 मीटर, भार वाहून नेण्याची क्षमता-3000 किलोग्रॅम
आकाश क्षेपणास्त्र
वेग-3087 किमी/तास, लांबी-5.78 मीटर, वजन-720 किलोग्रॅम, मारक पल्ला-80 किलोमीटर, भार वाहून नेण्याची क्षमता-60 किलोग्रॅम









