सावंतवाडी / प्रतिनिधी –
राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने प्राप्त ‘शैक्षणिक साहित्य वाटप’ कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विकासभाई सावंत यांनी विद्यार्थ्यांनी सर्वगुण संपन्न व संस्कारक्षम घडण्यासाठी थोरा मोठ्यांचे चरित्र वाचणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी त्यांचे अनुकरण करतील, मेहनत करायला शिकतील,मोहाला बळी पडणार तर नाहीतच उलट मोठे होऊन गरजू लोकांना दान करण्याचे संस्कार होतील. यावेळी 1993-94 बॅच मधील 10 वी चे माजी विद्यार्थी सतिश सावंत, संदिप सामंत,वैभव राऊळ, तुळशीदास पित्रे, दीपक गावडे ,उपस्थित होते. तसेच ,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व माजी मुख्याध्यापक व्ही. बी.नाईक, उपमुख्याध्यापक एस. पी. नाईक , पर्यवेक्षक साळगांवकर इ.शिक्षक उपस्थित होते . कार्यक्रमाची सूत्रसंचालन श्रीमती पुनम हर्षल कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्रीमती रेश्मा गुरुप्रसाद राणे यांनी केले.